गुरुवार, 12 जनवरी 2017

माऊली एक वेद

ज्ञानराज माझि योग्याची माऊली ! जेणे निगमवल्ली प्रगट केली ! ! गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ! ब्रम्हा लहरी प्रगट केली ! ! अध्यात्मविदयेचे दाविलेसे रूप ! चैतन्याचा दीप उजळला ! ! छपन्न भाषेचा केलासे गौरव ! भवार्नावि नाव उभारिलि ! ! श्रवणच्या मिशे बैसावे येऊनी ! स्मार्ज्य भुवनी सुखी नांदे ! ! आणि - नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ! एक तरी ओवी अनुभवावी ! ! अर्थात - देवाचे लाडके भक्त नामदेवराय या अभंगांत ज्ञानोबा माऊली आणि त्यांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचे यतार्थ वर्णन करतात - कि - माझि ज्ञानोबा माऊली हि नुसती माऊली नसुन तर ती योग्यान्चि माऊली आणि त्यांनीच हि खरी सुरूवात केली असं माह . प्रथम चरणात बोलतात - बर् काय केले ज्ञानराज माउलींनी तर त्याचे उत्तर नामदेवराय द्वितीय चरणात सांगतात - ज्ञानेश्वरी सारखा अनमोल असा ग्रंथ लिहून नामाची ब्रम्हा लहरी तुमच्या - आमच्या पर्यंत पोहोचवले . अर्थात तिच गीता होय . पण बारकावा नामदेव राय या चरणात सांगतात - गीता - हि सोन्याचा गोळा आहे त्यावर माउलींनी ज्ञानेश्वरी लिहून वा सांगून तुम्हा - आम्हांला अलंकार बनवून दिले जेणे करुन आपण तें परिधान करू वा घालू . म्हणून माह . तिसऱ्या चरणात सांगतात कि - आध्यात्मिक मार्गाचा रस्ता वा रूप माझ्या ज्ञानोबा माउलींनी या विश्वाला दाखवला आणि चैतन्य निर्माण केले . एवढेच काय त्यात विविध भाषेचा वापर करुन एक प्रकारची नावच तयार केली म्हणजे आपण त्यात बसून भवसिंधु पार करू . हे नामदेव राय चौथ्या चरणात बोलतात - आणि अशी हि ज्ञानेश्वरी श्रवण करण्यासाठी आपण जर बसलो तर सुखच सुख प्राप्त होईल म्हणून शेवटच्या चरणात नामदेव राय म्हणतात तुम्ही - आम्ही एक तरी ओवी आपल्या जीवनात अनुभावी आणि त्याचे अनुकरण करावे . अप्पा माह . नाशिक आज ज्ञानोबा माऊली पालखी सोहळा आळंदीहून निघणार आहे म्हणून हा अभंग आज आम्हांला सुचला . तसं बघितलं तर - भगवान् दत्तात्रय - योगी , भगवान शंकर - योगिराज , कारण पार्वतीचा पतीराज योगीराज असं नामदेव राय म्हणतात . भगवान श्रीकृष्ण - योगेश्र्वर , कारण यत्र योगेश्र्वर असा गीतेतील शेवटचा श्लोक आहे तर माझि ज्ञानराज या सर्वांचे मुगुट स्थान म्हणजे - योग्यान्चि माऊली आहे असं नामदेव राय प्रथम चरणात वर्णन करतात . अप्पा माह . आज आळंदीला - विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव होईल आणि सर्व स्वर्गाहून हा सुख सोहळा आज पाहतील यात तिळमात्र पण शंका नाही . कारण माउलींचा कळस याला साक्ष देईल . अप्पा माह . सर्व जगाचे लक्ष आज माझ्या ज्ञानोबा माउलींवर राहील मग झि tv असो  वा आज तक असो वा मी मराठी chanal  असो . अप्पा माह . नाशिक सर्वाना ज्ञानोबा माऊली सुखी ठेवू हिच त्यांच्या चरणी प्रार्थना अप्पा माह . म्हणून trतर नाथ माह . वर्णन - सर्व सुखाची लहरी ! ज्ञानाबाई अलंकापुरी ! ! कोटी कोटी प्रणाम माझ्या योग्यान्चा माऊली ला अप्पा माह . #twitter

रविवार, 25 दिसंबर 2016

शनिवार, 10 दिसंबर 2016